(हॅलो बुलढाणा) अलीकडे काही ना काही कारणावरून मारहाणीच्या घटना समोर येत आहेत. एकाने चक्क माझ्या जागेत पूलाचे पाणी जाईल म्हणून शासकीय कंत्राटदारालाच जीवे मारण्याची धमकी दिली. मनोज लाहुडकर, मनीष मोहता असे आरोपीचे नाव आहे.या बाबत अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे.
प्रकरण असे आहे की,ऋषिकेश चंद्रशेखर देशमुख कनिष्ठ अभियंता सार्वजनिक
बांधकाम उपविभाग खामगांव रा. केला नगर खामगांव म्हणाले की,गैरअर्जदार मनोज लाहुडकर, मनिश मोहता दोन्ही रा. उदयनगर ता. चिखली मी लेखी फिर्याद देतो कि वरील ठिकाणी राहणारा असुन सार्वजनिक बांधकाम उपविभाग खामगांव यांची वरवंड, उदयनगर बाळापुर राज्य महामार्ग क्रं. 274 व 269 या रस्त्याचे
नुतनीकरणासाठी नियुक्ती झालेली आहे. सदर रस्त्याचे काम नांद्रा इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन कंपनी पुणे यांना दिलेले आहे. सदर मार्गावरील उदयनगर ते डासाळा रोडवरील पुलाचे बांधाकामामुळे उदयनगर येथील मनोज लाहुडकर याचे जागमध्ये पाणी जाइल अशी तोंडी तक्रार असल्याने आम्ही यापुर्वी त्यांना पुलाचे ले आउट काढुन मोजमाप करुन दाखविले होते. त्यावेळी सुध्दा त्यांनी वाद करत त्यांच्या जागेच्या बाजुने संरक्षण भिंत बांधुन मागीतली होती. त्यावेळी आम्ही मनोज लाहुडकर यांना
संरक्षण भिंत बांधुन देण्याबाबत या कामाचे करार नाम्यामध्ये नसल्याचे त्याला सांगितले होते व
तुमची काही अडचन असल्यास तुम्ही आमचे कार्यालयामध्ये लेखी तक्रार करा असे सांगीतले होते.मात्र मागील दोन दिवसामध्ये उदयनगर ते वरवंड भागामध्ये पाउस जास्त झाल्याने
16 जून 2024 रोजी दुपारी 03/30 वा च्या सुमारास उदयनगर ते डासाळा जाणा-या रोड वरील सहकार विदया मंदीर शाळेच्या अलीकडील रोडच्या पुलाचे बांधकाम चालु असल्याने पुलाची पाहणी करीत असतांना तेथे मनोज लाहुडकर व मनिष मोहता हे तेथे आले व मनोज लाहुडकर मला म्हणाले की,तुम्ही पुलाचे चुकीचे बांधकाम करीत असल्यामुळे माझे जागेत पाणी जाइल तुम्ही पुलाचे हेतु पुरस्पर
माझे जागेत पाणी जाइल या उददेशाने पुलाचे बांधकाम करत आहेत. तुम्ही माझे जागेला संरक्षणभिंत बांधुन दया असे म्हटले असता मी त्यांना सांगीतले की, या कामाचे करार नाम्यामध्ये संरक्षण भिंत बांधुन देता येत नाही. तुमची काही अडचण असल्यास तुम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करा.तेव्हा मनोज लाहुडकर याने मला शिवीगाळ करण्यास सुरु करुन तु कसा इंजिनीअर झाला तुला पुलाचे मोजमाप सुध्दा कळत नाही का ? तु काम बंद कर असे म्हणाला तेव्हा त्याचे सोबतचा इसम समोर आला व मला म्हणाला की, माझे नाव मनिष मोहता आहे लक्षात ठेव आणी तु लवकर काम बंद कर असे म्हणुन मला शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली. व मनोज लाहुडकर याने माझी कॉलर धरुन मला चापटयाबुक्यांनी मारहाण केली. त्यामध्ये माझे शर्टाचे बटन तुटले व माझे
गळयावर नखे ओरबडले. तसेच मनोज लाहुडकर तुम्ही या पध्दतीने पुलाचे बांधकाम केल्यास मी
जिवाने मारुन टाकीन अशी धमकी दिली. तेथे नांद्रा इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन कंपनीचे यंत्र सामग्री व वाहन व्यवस्थापक रणदीप गौतम व पुलाचे मजुर ठेकेदार सैयद नावेद रा. अकोट हे हजर होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.