बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जगप्रसिद्ध कुस्तीपटू ‘द ग्रेट खली’ची बुलढाण्यात रॉयल एन्ट्री झाल्याने आज पहेलवान प्रेमींमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण दिसून आले.आमदार संजय गायकवाड यांच्या पुढाकारातून खली यांनी बुलढाण्यात नव्याने बांधलेल्या धर्मवीर आखाड्याचे शानदार उद्घाटन केले.
दिलीप सिंह राणा हे कुस्ती लढणारे खेळाडू आहेत. ते डब्ल्यु डब्ल्यु ई मधील ‘द ग्रेट खली’ या नावाने जगविख्यात आहेत. २००७ मध्ये डब्ल्यु डब्ल्यु ईत ते वर्ल्ड हेविवेट च्यांपियन झालेत.आणि आज त्यांचे बुलढाण्यात आगमन झाले आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी धर्मवीर आखाड्याचे उद्घाटनासाठी त्यांना आमंत्रित केले होते.दरम्यान खली बुलढाण्यात येताच त्यांच्यावर स्वागताचा वर्षाव झाला.धर्मवीर आखाड्यात अत्याधुनिक विविध साहित्यांचा अंतर्भाव करण्यात आला असून सुदृढ आयुष्य घडविण्यासाठी कसरतींचे अनेक उपकरणे कार्यान्वित आहेत.या धर्मवीर आखाड्याचे उद्घाटन करण्यासाठी द ग्रेट खली यांना आमंत्रित करण्यात आले असता आज त्यांची रॉयल एन्ट्री झाल्याने बुलढाणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.