चिखली (हॅलो बुलडाणा) मेहकरहून चिखलिकडे येत असतांना वर्दडा फाट्याजवळ दोन दिवसापासून बंद पडलेल्या महामंडळाच्या बसला टूव्हीलर धडकल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. पोस्ट मॉर्टम साठी चिखली ग्रामीण रुग्णालयात दाखल.
सविस्तर असे की वर्दडी फाटा येथे बंद पडलेली बस उभी होती त्या बसला मेहकर कडून येणारी टू व्हीलर एम एच २८ बी एल ०८४६ धडकल्याने दुचाकीस्वार तिघांचा घटनास्थळावर मृत्यू झाला. मृतांची नावे
गोपाल सुरडकर (बेराळा) सुनिल सोनुने (रायपूर) धनंजय ठेंग (वाघापूर अंत्री) असुन तिघे तरुणांचे वय अंदाजे २०ते २५ असल्याचा अंदाज आहे पुढील तपास साखर खेर्डा पोलीस स्टेशन चे डोईफोडे साहेब करीत आहे.