बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चहाच्या कागदी कपावर बंदी घालावी, घरकुलांची जागा नियमाकूल करावी, स्वस्त धान्य दुकानदारांना राशन वाटपाचे आदेशित करावे, एसटी बस वेळेवर द्यावी आझाद हिंद ने यापूर्वी दिलेल्या निवेदनांची चौकशी करून कारवाई करावी.यासह विविध नागरी समस्यांच्या मागणीपूर्तीसाठी आझाद हिंद च्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे पाटील यांच्या नेतृत्वात आज 7ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
ठिय्या आंदोलना दरम्यान
मागणीच्या अनुषंगाने त्वरित जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी संबंधित अधिकाऱ्यांनी बैठक बोलविली मागणीप्रमाणे चर्चा केली. चर्चेतून मागण्या निकाली लावण्याचे आदेश लवकरच पारित करण्याचे आश्वासन दिल्यामुळे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
▪️चहाच्या कागदी कपावर बंदी का..?
कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांना कारणीभूत असलेल्या चहाच्या कागदी कपांवर त्वरित बंदी घालावी.तशे आदेश निर्गमित करून कारवाई करावी. अतिक्रमित घरकुल नियमाकूल करून जागावाटप करावी.
मोताळा तालुक्यातील बोराखेडी ते दहिगाव रस्ता डागडूजी करून अतिक्रमण मुक्त करावा.
चहाचे कागदी कप बनवितांना त्यामध्ये बीपीए नामक केमिकल चा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळेच सदर कागदी कपांना मान्यताप्राप्त दर्जा मिळालेला नाही.
सदर कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रो प्लास्टिक वितळते आणि चहाद्वारे पोटात जाते. एका कपात चहा घेतल्याने लाखो मायक्रो प्लास्टिकचे कण पोटात जातात ज्यामुळे हजारो नागरिकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये सदर कागदी कपावर बंदी आलेली आहे. या अनुषंगाने रिसर्च करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञ आणि तज्ञांनी सुद्धा सदर कपावर बंदी आणण्याची सूचना सरकारला केलेली आहे. त्यास पार्श्वभूमी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत तसेच आपल्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रशासकीय यंत्रणांना आदेशित करून सदर कागदी कपावर त्वरित बंदी घालावी. तसे आदेश निर्गमित करावे.अन्यथा नाईलाजास्तव आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.