बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा शहरात सुरू असलेल्या पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचे काम अंतिम टप्प्यात असून योजनेची चाचणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची दिलासादायी बातमी आहे.
शहरातील नागरिकांना आता दीपावली पर्यंत दररोज पाणीपुरवठा केला जाईल. त्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन लवकरच केले जात असून कोणालाही पाणीटंचाईच्या झळा बसणार नाही, अशी ग्वाही आमदार संजय गायकवाड यांनी येळगाव धरण येथे जलपूजन विधी प्रसंगी दिली होती.
येळगाव धरण हे शंभर टक्के भरले आहे.पैनगंगातही भरपूर जलसाठा असल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता आता मात्र कायमची मिटणार आहे. कारण आमदार संजय गायकवाड यांच्या नियोजनातून शहराला नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. दीपावली पर्यंत नागरिकांना दररोज पाणीपुरवठा उपलब्ध होईल, याला नगर पालिकेचे प्रशासक गणेश पांडे यांनी दुजोरा दिला असून सध्या योजनेची चाचणी सुरू असल्याने होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली आहे.