बुलढाणा (हॅलो बुलढाणा) निवडणूक काळात अवैधरित्या पैश्यांची वाहतूक होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने बुलढाणासह महाराष्ट्रातील बँकांवर वेळेचे निर्बंध घातले असून हवाईमार्गे बेकायदेशीर गोष्टी होऊ नये म्हणून हेलिकॉप्टर्सची तपासणी होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
मुंबईत आज निवडणूक आयोगाची
पत्रकार परिषद आज पार पडली.यावेळी
निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक
आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्राला सहा राज्यांच्या सीमा आहेत. या सीमांवर 300 चेकपोस्ट तयार केल्या जातील.जेणेकरून अवैध रोख रक्कम,अंमली पदार्थ, दारू
राज्यात आणण्यापूर्वी रोखली जाईल.
तसेच रुग्णवाहिका आणि एटीएममध्ये
रोख रोक्कम भरण्यासाठी जी कॅश व्हॅन वापरली जाते त्यावरही नजर ठेवली जाईल. संध्याकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी आठ वाजेपर्यत या व्हॅन वापरल्या जाणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश कुमार यांनी दिले आहे. तसेच निवडणूक प्रचाराच्या काळात
हेलिकॉप्टरचा वापर होतो. अशा वेळी हवाई मार्गे बेकायदेशीररित्या वस्तूंची वाहतूक होऊ नये म्हणून सर्व हेलिपॅड्सवर हेलिकॉप्टर्सची तपासणी केली जाईल,अशी ही माहिती आयोगाने दिली आहे.