बुलढाणा (हॅलो बुलढाणा) येथील सहकार विद्या मंदिर च्या सांस्कृतिक सभागृहात २९ सप्टेंबर रोजी पार पडलेली ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक होते. सुमारे ५ हजारावर च्या वर सभासद या आमसभेला उपस्थित होते.
बुलडाणा अर्बनला आम्ही कुटुंब मानतो आणि हे कुटुंब देशभरामध्ये आदर्श आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. येता काळ हा शेती व्यवस्थेवर अवलंबून असणारा काळ असणार आहे. जगभरामध्ये जमीन कमी होत आहे. तर त्या उलट अन्नाची गरज वाढत आहे. अनेक देशांमध्ये कधी ओला आणि कोरडा दुष्काळ असतो. त्यामुळे शेती उत्पादनात साठवून ठेवण्याची क्षमता आपल्याला वाढवावी लागणार आहे. आगामी काळात बुलडाणा अर्बन अन्न सुरक्षेच्या दृष्टीने गोदाम श्रुंखलेला अधिक बळ देणार असल्याचे प्रतिपादन बुलडाणा अर्बन चे संस्थापक राधेश्यामजी चांडक उपाख्य भाईजी यांनी केली.
यावेळी भाईजींनी शेतकऱ्यांचा उत्पादित माल निर्यात करण्यावर भर दिला,व निर्यात करण्यासाठी लागणारे तांत्रिक ज्ञान अवगत करणेसाठी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा माल निर्यात करणे, सभासदांना सुलभ होणार आहे.यासाठी बुलडाणा अर्बन फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या सहकार्यातून मालाची निर्यात केली जाणार आहे.प्रायोगीक तत्वावर लवकर गुलाब फुलांची निर्यात करण्यात येणार आहे.असेही सांगितले, तसेच देशातील विद्युत निर्मिती क्षेत्रातील संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने सौरऊर्जाचा उपयोग करून घ्यावा.संस्था लवकरच चिखली येथे सौरऊर्जा प्रकल्प करणार असल्याचे ही सांगितले.
संस्था पुढील वर्षी अयोध्या येथे भक्तनिवास निर्माण करण्यावर भर देणार आहे. बाहेरील राज्यात काम करतांना कायद्याच्या अनेक अडचणी येतात, परंतु सद्भावना सेवा समितीच्या वतीने १२ नोव्हेंबरला अयोध्या येथे संगीतमय सुंदरकांडचे आयोजन केले आहे. यादरम्यान तेथे भक्तनिवाससाठी निश्चितच जागा फायनल करु, असे ही भाईजी यांनी सांगितले.
सोबतच धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी सभासदांच्या विशेष रेल्वे सहलीच्या आयोजन बुलडाणा अर्बन केले आहे. यात बौद्धगया ,राजगिर , नालंदा, सारनाथ, लुंबिनी नेपाळ व कुशीनगर येथे ही विशेष यात्रा जाणार असल्याची माहिती प्रसंगी भाईजी यांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे सभासदांना यावर्षी ११% लाभांश देखील जाहीर करण्यात आला आहे.
▪️नवीन तंत्रज्ञानावर भर देणार – डॉ. सुकेश झंवर
संस्थेचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ सुकेशजी झंवर यांनी संस्थेचा संपूर्ण आढावा सादर केला. संस्थेच्या प्रगतीची आकडेमोड सांगितली. गोल्ड लोन वाटप वाढले आहे. वेअर हाऊसचा फायदा सात लाखापेक्षा अधिक शेतकरी घेत आहेत.संस्थेचे १३ कोल्ड स्टोरेज असून त्याचाही शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. संस्था आगामी काळात नवनवीन टेक्नॉलॉजी आणण्यावर भर देणार आहे. जेणेकरून सभासदाला अत्याधुनिक तंत्रज्ञान माध्यमातून सेवा तत्पर मिळेल. त्यामुळे सर्वांचा वेळ वाचेल. आज संस्थेच्या सभासदाला क्यूआर कोड, डिजिटल बॅंकीग प्रणाली, एटीएम व BU pay अशा प्रकारच्या सुविधांचा लाभ मिळत आहे. सोबतच चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत सुरू असलेल्या शाळा ह्या उच्च शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध आहेत, असेही यावेळी डॉक्टर सूकेश झंवर म्हणाले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक व चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ सुकेशजी झंवर यांच्या शुभहस्ते प्रामाणिकपणा जपणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी वेद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शांतीपाठ म्हटला. सभा सुचीचे वाचन संजय कुलकर्णी यांनी केले. सुत्रसंचलन गजानन धांडे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ किशोर केला यांनी केले. या कार्यक्रमासाठी बुलडाणा अर्बन सरव्यवस्थापक श्री कैलास कासट व मुख्यालयातील सर्व पदाधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
▪️सभासदांनी दिली भेट !
या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला सहकार विद्या मंदिर च्या विद्यार्थ्यांनी बॅन्ड पथकाने राष्ट्रगीत व गणपतीची आरती सादर करून उपस्थितांची मने जिंकली.या सभे करिता महाराष्ट्रातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, लातूर धाराशिव,
जळगांव खां, वर्धा या जिल्ह्यातून तसेच मध्यप्रदेश, तेलंगण, आंध्रप्रदेश या राज्यातून सभासद सदस्य तसेच संचालक, खातेदार मोठ्या प्रमाणात आले होते. त्यांच्या जेवणाची व्यवस्था व शेगांव येथे निवास व्यवस्था करण्यात आली होती. बुलडाणा अर्बनच्या मुख्यालयात, वेद विद्यालय, डोंगर खंडाळा येथील स्पिनिंग मिल, चिखली व मलकापूर येथील कोल्ड स्टोअर गोदाम तसेच सहकार विद्या मंदिर येथे देखील सभासदांनी भेट दिली.