spot_img
spot_img

“आंदोलन!” भूमि हक्क परिषदेचे जिल्हा कचेरीसमोर धरणे ! -मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर आंदोलनाचा इशारा !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भूमी हक्क परिषदेने विविध मागण्यांना घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्री यांच्या दालनासमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात वन जमिनीच्या अनुषंगाने केलेल्या अभिभाषणाची व आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावी,वन हक्क,ई क्लास गायरान जमीन, 1990 पूर्वीच्या वन फड महसूल विभागाच्या जमिनी नियमानुसार कसणारांच्या नावे करण्यात याव्या. बुलढाणा जिल्ह्यातील रद्द केलेल्या दाव्यांचे पुनरावलोकन करावे.यासह इतर मागण्यांचे निवेदन
प्रशासनाला देण्यात आले. मागण्यांच्या अनुषंगाने त्वरित पूर्तता न झाल्यास यापुढील आंदोलन मुंबई स्थित मुख्यमंत्री दालनासमोर करण्याचा निर्धार भूमि हक्क परिषदेच्या वतीने यावेळी जाहीर करण्यात आला.
आंदोलनात भूमि हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष के.जी.शाह,आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे पाटील, संस्थापक महासचिव रामकृष्ण मोरे,प्रदेश उपाध्यक्ष दामोदर साळवे, जिल्हाध्यक्षा सौ मिरा काळे, कार्याध्यक्ष अकिल शाह, उपाध्यक्ष राजेश गायकवाड,अशोक गायकवाड, महासचिव सईद शाह,तानाजी मुंडे, बबन खंदारे,यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो शेतकरी शेतमजूर प्रामुख्याने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!