spot_img
spot_img

💥ब्रेकिंग ! ‘फटा पोस्टर..’ तरी विधानसभा निवडणुकीत ‘ताईच’ जिंकणार! -दिशा बचत गट प्रदर्शनीचे पोस्टर फाडले ! -जयश्रीताई म्हणाल्या .. -लडकी हूँ लड सकती हूँ !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा जिल्हा दिशा बचत गट फेडरेशन प्रदर्शनीचा लावण्यात आलेला फलक फाडण्याचा प्रयत्न प्रकार आज सकाळी समोर आला आहे. हजारो उद्योजिकांच्या पंखात बळ भरणाऱ्या दिशा बचत गटाचे कार्य अमाप आहे. त्यामुळे ‘फटा पोस्टर..’ तरी विधानसभा निवडणुकीत ‘ताईच’ जिंकणार ! असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केलाय तर जयश्रीताईंनी या प्रकाराचा संताप व्यक्त केलाय.

दिशा बुलढाणा जिल्हा बचत गट
फेडरेशन अंतर्गत जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा शहरात दरवर्षी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येत असते. यंदा मात्र ही बचत गट प्रदर्शनी ऐतिहासिक ठरणार असल्याने या प्रदर्शनीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान प्रदर्शनीच्या प्रसिद्धीसाठी बुलढाणा
शहरातील कान्या कोपऱ्यात प्रदर्शनीचे फलक झळकले आहेत. आज त्यामधील काही ठिकाणीवरील बॅनर अज्ञात कुणीतरी फाडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान ॲड जयश्रीताई शेळके यांनी संताप व्यक्त करीत ‘ हीच ती
गुंडशाही आहे, झुंडशाही आहे..
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!