spot_img
spot_img

अखेर बुलढाणा ते वरवंड रस्ता अपघातास कारणीभूत ठरला! -ॲपेचालक गंभीर जखमी -सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदारावर फौजदारी गून्हा दाखल करण्याची मागणी!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा ते वरवंड फाट्यापर्यंतचा धोकादायक रस्ता अखेर एका ॲपे चालकाच्या अपघातास कारणीभूत ठरला. ॲपे चालक गंभीर जखमी झाला असून,या संदर्भातील वृत्त ‘हॅलो बुलढाणा’ ने तत्पूर्वीच प्रसारीत करून सार्वजनिक बांधकाम विभागाला पूर्व संकेत दिला होता हे विशेष !

बुलढाणा ते वरवंड फाट्यापर्यंत चा रस्ता खड्डेमय झाल्यामुळे रहदारीला मोठा अडचणीचा ठरतोय.दरम्यान या रस्त्याची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाने यारस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले परंतू ते कासव गतीने सुरू आहे.रस्त्याच्या बाजूला एक भला मोठा खड्डा पडलेला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्षच गेले नाही.दरम्यान २० सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळेला खड्डा न दिसल्याने एमएच 28 टी 22 34 क्रमांकाचा ॲपे थेट खड्ड्यात घुसल्याने अपघात झाला. ॲपे चालक दिलीप नयनसिंग राठोड (28) रा. वरवंड हा गंभीर जखमी झाला. सुदैवाने ॲपेमध्ये इतर प्रवासी नसल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार या अपघाताला कारणीभूत ठरत असल्याने त्यांच्यावर फौजदारी गून्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!