बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आमदार संजय गायकवाड यांनी एका महिलेची जमीन हडपल्याचा आरोप करीत महिलेने मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमानंतर मला माझी जमीन परत करा व न्याय मिळवून द्या असे बॅनर भर कार्यक्रमात झळकवले तसेच काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. त्यामुळे एकच कल्लोळ उडाला होता.
मोताळा येथे रिता उपाध्ये या महिलेची गट नंबर 62 मध्ये दीड एकर जमीन आहे.ही जमीन आमदार संजय गायकवाड यांनी बळकावली असल्याचा महिलेने आरोप केला.2021 पासून आमदार गायकवाड यांनी जबरदस्तीने व बेकायदेशीरपणे सदर जमीन कब्ज्यात करून त्यातील मुरूम उत्खनन केले व त्यावर फार्म हाऊस बनविले. दिपाली चौबे या महिलेसोबत संगणमताने आमदारांनी ही जमीन हडपली.दरम्यान या प्रकरणी सदर महिला सर्व पुरावे घेऊन न्यायालयात गेली असून न्यायालयाने बुलडाणा आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल देण्याचे आदेश दिले आहेत परंतु बोराखेडी पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल केला नसल्याची प्रतिक्रिया पीडित महिलेने पत्रकारांना दिली.याबाबत पोलिसांनी 28 फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान या पीडित महिलेने आज न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बुलडाणा येथील लाडकी बहीण कार्यक्रमानंतर बॅनर झळकवून व काळे झेंडे दाखवून ‘आपल्याच पक्षाचे नेते जर असा अन्याय अत्याचार करत असेल तर महिलांचे काय होणार ? असा प्रश्न त्यांनी
मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला आहे.