spot_img
spot_img

💥 Exclusive अन्…पुन्हा एक बोट केली नष्ट ! -25 ब्रॉस रेतीचा जप्त साठा जप्त ! -संतोष भुतेकरांच्या आंदोलनाच्या इशाराने महसूल विभाग हादरला!

देऊळगांव राजा (हॅलो बुलढाणा /संतोष जाधव)शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी खडकपूर्णा प्रकल्पातील रेती उपसा प्रकरणी महसूल मंत्र्यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासकीय यंत्रणाच्या हालचाली दिसून येत असून रेती माफियांवर कारवाई केली जात आहे. तत्पूर्वीस तीन बोटी नष्ट करण्यात आल्या होत्या.आजही एक बोट नष्ट करण्यात आली.

बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा खडक पूर्ण प्रकल्प या प्रकल्पातील रेती उपसा व अवैध रेती वाहतूक सर्रास होत असल्याने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी वारंवार तक्रारी करून ही कारवाई होत नव्हती त्यामुळे त्यांनी मुंबईत दाखल होऊन महसूलमंत्र्यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.दरम्यान आज 18 सप्टेंबर रोजी देऊळगाव राजा तालुक्यात पोलीस व महसूल प्रशासनाच्या संयुक्त पथकाद्वारे अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई करण्याचे अनुषंगाने मौजे दगडवाडी, मेहुनाराजा, बायगाव, चिंचखेड व सुलतानपूर या भागात रेती माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी शोध मोहीम राबविण्यात आली. मौजे मेहुणाराजा क्षेत्रात खडकपूर्णा प्रकल्पाजवळ अवैध रेती उपसा करणारी बोट बाबत माहिती मिळताच, एक फायबर बोट जिलेटिन च्या साह्याने नष्ट करण्यात आली. तसेच त्याठिकाणी आढळून आलेला जवळपास 25 ब्रास रेती साठा मौजे मेहुणाराजा येथील घरकुल लाभ धारकांना देण्यात आला. सदर कारवाई ही सिंदखेड राजा महसूल उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे,देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, अंढेरा ठाणेदार विकास पाटील, तलाठी तागवाले, देशपांडे, चिकटे, विलास नागरे, बुरकुल, खरात, तांबे, शिपाई अर्जुन सोनसळे, कोतवाल शरद काकडे, अश्विनी आंधळे, संदीप चेके, मारुती बंगाळे यांच्या समवेत करण्यात आली. यापुढेही अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटी व वाहनांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा सिंदखेड राजा उपविभागीय महसूल अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी दिला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!