बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जवळपास 18 पुतळ्यांच्यावर 19 सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.त्यामुळे 19 सप्टेंबरला म्हणजे उद्या शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे नाहक शैक्षणिक नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांनी ‘हॅलो बुलढाणा ‘ला दिली आहे.
शाळेला सुट्टी देणं हे कोणत्या तत्त्वात बसते ?असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.दरम्यान हे सर्व गर्दी जमा करण्यासाठीचे फंडे असल्याचे आणि ‘लोकशाही विरुद्ध हुकुमशाही’ असे शहरात लावण्यात आलेले फलक काढण्यात आल्याने एकंदर सर्वसामान्यात रोष दिसून येत आहे.
उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,
अजित पवार, उदयनराजे भोसले, सुधीर मुनगुंटीवार, दिलीप वळसे, रक्षाताई खडसे, प्रतापराव जाधव, असे मंत्रीगण उपस्थित राहणार आहेत.परंतु या कार्यक्रमासाठी सर्व शाळांना सुट्टी देण्याचे कारण अनेक सुज्ञ पालकांना समजले नाही. दिवाळीच्या आधी प्रथम सत्र परीक्षा आहेत. त्यामुळे शाळेमध्ये घटक चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे.दरम्यान शाळांना सुट्टी दिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे जयश्रीताई शेळके यांनी म्हटले आहे.त्या असेही म्हणाले की आमदार संजय गायकवाड यांनी आयोजित केलेल्या या पुतळ्यांच्या लोकार्पण सोहळ्यात शाळेंना सुट्टी द्यायला नको होती.कुण्या राजकीय मंत्र्यांचा दौरा असल्यावर शाळेला सुट्टी देणे कितपत योग्य आहे ?असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. या कार्यक्रमाला गर्दी होणार नव्हती त्यामुळे गर्दी होण्यासाठी हे वेगवेगळे फंडे वापरणं योग्य नाही.विद्यार्थ्यांच्याशैक्षणिक नुकसानाचा तरी विचार करायला पाहिजे.दुसरे असे की शहरांमध्ये ‘लोकशाही विरुद्ध हुकुमशाही ‘ असे फलक झळकले ‘त्यामुळे जनसामान्यांचा रोष वाढल्याचे ही शेळके म्हणाल्या.