बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आज लाडक्या बाप्पांना मनोभावे निरोप देण्यात येऊन ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे साकडे घालण्यात आले. मात्र यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी निर्बंध लादूनही काही मंडळांनी गुलालबंदीचे व ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडीत काढल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा साखरखेर्डात फज्या उडाला.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी तत्पूर्वीच रासायनिक गुलाल,डीजे व लेझर लाईटच्या वापरावर बंदीचे आदेश काढले होते.दरम्यान पोलीस यंत्रणेने सुद्धा याबाबत जनजागृती करून कारवाईचा इशारा दिला होता. पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करावा तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले होते.गेल्या चार दिवसाआधी साखरखेर्डात एका गुलाल विक्रेत्यावर कारवाई देखील करण्यात आली. परंतु आज गणेश विसर्जन मिरवणुकीत काही मंडळांनी डिजेच्या दणदणाटात
उडत्या चालीच्या गाण्यांवर बेधुंद थिरकतांना गुलालांची उधळण एवढी केली की,अजूनही जमिनीवर गुलालाचा थर साठलेला आहे. शासनाचे नियम गणेश मंडळांनी धाब्यावर ठेवले असताना अघाप पर्यंत पोलीस कारवाई मात्र दिसून आलेली नाही.