spot_img
spot_img

विविध कल्याणकारी योजनांमूळे ऑटो रिक्षा होणार गतिमान ! -आनंद दिघे कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन !

बुलढाणा(हॅलो बुलढाणा) राज्य शासनाकडून धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळामार्फत ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार असून संबंधितांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती आज 17 सप्टेंबरला उपप्रादेशिक परिवहन मंडळाने ‘हॅलो बुलढाणा’ला दिली आहे.

मंडळामार्फत जीवनविमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्य विषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्य वृद्धी योजना, 65 वर्षावरील ऑटो रिक्षा व मिटर्ड टॅक्सी परवानाधारक यांना निवृती सन्मान योजने अंतर्गत सानुग्रह अनुदान, नवीन ऑटो रिक्षा, मिटर्ड टॅक्सी खरेदी, गृह खरेदीसाठी कर्ज आदी योजना राबविण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत नोंदणी प्रक्रिया उप प्रादेशिक परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. मंडळाच्या सभासदत्वासाठी अर्जदाराकडे राज्यामध्ये नोंदणी असलेल्या ऑटो रिक्षा, मिटर्ड टॅक्सी अनुज्ञप्ती व बॅच असणे बंधनकारक राहील. नोंदणीकृत चालकांना मंडळाच्या जिल्हास्तरीय कार्यालयाकडून ओळखपत्र देण्यात येणार असून 500 शुल्क आहे. वार्षिक सभासद शुल्क तीनशे रुपये ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.
चालकांनी योजनांच्या लाभासाठी जिल्हास्तरीय समितीकडे विहीत नमुन्यात अर्ज करणे आवश्यक राहील. या योजनांची सभासद नोंदणीकरिता ऑनलाईन (Pune) प्रणाली विकासात करण्यात येत असून, संबधीत प्रणालीदार अर्जदार सभासदाची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणी प्रक्रिया, अटी व शर्ती, मंडळाच्या योजना आदींबाबत अधिक माहितीसाठी प्रादेशिक पारिवहन कार्यालय बुलडाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहनही उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!