spot_img
spot_img

अखेर आमदार गायकवाडांवर दखलपात्र गुन्हा दाखल! -कुणाल चौधरी म्हणाले ..अटक झाली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या दिवशी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता आंदोलनासाठी घरा बाहेर पडेल!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भारताचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीभ छाटण्याच्या वक्तव्यावर आज काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली होती.पोलीस ठाण्यात 4 घंटे ठाणे मांडल्यानंतर पोलिसांनी आधी अदखलपात्र तर रात्री आठच्या दरम्यान दखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.पोलीस यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या किती दबावात आहे हे यावरून दिसून आले. दरम्यान गायकवाड यांना अटक झाली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या दिवशी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता आंदोलनासाठी घरा बाहेर पडेल!असा इशारा मध्यप्रदेशचे माजी आमदार कुणाल चौधरी यांनी यावेळी दिला.

सकाळी सर्वप्रथम ‘हॅलो बुलढाणा’ने आमदार गायकवाड यांच्या सदर वक्तव्याची बातमी प्रसारित करताच राज्यभरच नव्हे तर देशभर खळबळ उडाली.याप्रकरणी काँग्रेसकडून तीव्र पडसाद उमटले.दरम्यान
काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष
आक्रमक झालेत.काँग्रेसचे पोलीस ठाण्यात या आंदोलन सुरू असताना आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एक आक्रमक विधान केले.19 तारखेला मुख्यमंत्री बुलढाण्यात येत आहे. यावेळी काँग्रेसने कार्यक्रमात काही व्यत्यय आणला तर ? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता ‘काँग्रेसच्या कुत्र्यांना गाढून टाकीन !’ असे गायकवाड यांनी पुन्हा वक्तव्य केले.
इकडे आमदार संजय गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची पोलिसांनी नोंद केली.परंतु काँग्रेसला हे मान्य नव्हते. दरम्यान मध्यप्रदेशातून
आलेले काँग्रेसचे निरीक्षक आ.चौधरी, जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, आ. धीरज लिंगाडे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, ॲड. शेळके यांच्यासह काँग्रेसच्या शेकडो
कार्यकर्त्यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू ठेवून जोपर्यंत गायकवाड यांचे विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ठाण्यातून उठणार नाही अशी तटस्थ भूमिका घेतली होती.पोलिस गुन्हा दाखल करण्यास मागेपुढे करीत असताना काँग्रेसने ठाण्यातच अन्नत्याग आंदोलन सुरू करतो असा इशारा पक्षनिरीक्षक चौधरी यांनी दिल्याने अखेर पोलिसांनी आमदार गायकवाड यांचे विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल केला.त्यांच्या विरोधात 192, 351(2),352(3), 352 (4) बिएनएस कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!