बुलढाणा (हॅलो बुलढाणा) काँग्रेस नेते संजय राठोड यांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध चितावणीखोर वक्तव्य केल्यामुळे गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
सदर तक्रार संजय राठोड यांच्या नेतृत्वात विनोद बेंडवाल, तुळशीराम नाईक, मंगला पाटील आदींच्या उपस्थितीत दाखल करण्यात आली.
या तक्रारीत म्हटले आहे की, आज आमदार संजय गायकवाड यांनीएका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना उद्देशून भडकावू भाषण केले.त्यांनी भारताचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला अकरा लाखाचे बक्षीस देण्यात येईल असे जाहीर केले.या भडकाउ वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.या चितावणीखोर वक्तव्यामुळे मोठी तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.त्यामुळे कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.