डोणगांव (हॅलो बुलडाणा / हमीद मुल्लाजी) दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा डोणगांव नगरीत गणेश भक्तांनी गणरायाची भक्ती भावाने स्थापना केली, गणेशोत्सव व गौरी सणाने पुर्ण परिसर भक्तीमय झाला असून धार्मिक रितीरिवाजा प्रमाने लक्ष्मी गौरी मातेला भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे.आता उद्या 17 सप्टेंबर ला गणराया विसर्जन आहे, गणरायाला धांगडधिंगा टाळून
भक्ती भावाने निरोप द्यावा असे आवाहन माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केले.
माजी मंत्री सुबोध सावजी म्हणाले की, गणेश विसर्जनासाठी भक्ती भाव जोपासणे गरजे आहे.अभंग, धार्मिक गित, गणपती स्तोत्र, गणपती आरती द्वारे विसर्जन करावे,धार्मिक कार्यक्रमात धार्मिकता दिसुन आल्यास येणाऱ्या पिढीला धार्मिक मार्ग मिळतो, भक्तीमय वातावरणात गणेश विसर्जन करा,असे आवाहन माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी गणेश मंडळ भक्तांना केले आहे. डोणगांव पोलीस स्टेशन अंतर्गत अधिकृत 15 पेक्षा अधिक गणेश मंडळ यांनी गणरायाची स्थापना केली आहे, भक्तीमय वातावरणात विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम घेवुन गणेशोत्सव साजरा होत आहे, गणेश विसर्जन मिरवणूकसाठी ग्रामपंचायत प्रशासन व पोलिस प्रशासनने आवश्यक उपयोजना केल्या आहेत.