बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे 26 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील बंजारा समाजाचे नेते तथा कॅबिनेट मंत्री ना. संजय भाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील नंगारा म्युझियमचा लोकार्पण सोहळा, श्री.संत सेवालाल महाराज यांचे सुरु असलेले मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसहअनेक मंत्री गण हे येणार आहेत.या पार्श्वभूमीवर मेहकर येथे 17 सप्टेंबर ला कृषी वैभव लाॅन या ठिकाणी दुपारी 1.30 वाजता आढावा सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंञी मा. अजित दादा पवार व महाराष्ट्र शासनातील अनेक मंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तसेच भारतातील इतर राज्यातून सुद्धा अनेक राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील दिग्गज या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला देशातून जवळपास 15 लाखापेक्षा अधिक भाविक उपस्थित राहणार असल्याचे अंदाज आहे. तरी या संदर्भात पूर्व विदर्भात आढावा बैठक घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे बंजारा समाजाचे नेते तथा कॅबिनेट मंत्री ना.संजय भाऊ राठोड व त्यांचे खाजगी सचिव डॉक्टर विशाल राठोड साहेब यांच्या उपस्थितीत तसेच राजगड संस्थांचे महंत रायसिंग महाराज,टेंबुरखेड संस्थांचे महंत हिम्मत महाराज व देऊळगाव साखरशा संस्थांचे महंत रामदास महाराज,श्री संत भानुदास महाराज संस्थान मोहना चे विश्वस्त जानकिराम महाराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर मेहकर येथे दिनांक 17 सप्टेंबर 2024 ला कृषी वैभव लाॅन या ठिकाणी दुपारी 1.30 वाजता आढावा सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व बंजारा समाज बांधवांना आवाहन करण्यात येते की या सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.