बिबि (हॅलो बुलढाणा / भागवत आठोले) सुरू असलेल्या गणेशोत्सवाला सामाजिकतेची जोड देत श्रीराम प्रतिष्ठान आयोजित श्रीराम गणेश मंडळ बिबी यांनी श्री गणेश उत्सव पर्वा निम्मित रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरात 51 रक्तदात्यांनी रक्तदान करून ‘रक्तदान सर्वश्रेष्ठदान’ हा संदेश अधोरेखित केला आहे.
शिबिरामध्ये रक्तदानाची सुरवात ही श्री गणपती बाप्पा यांच्या आरती ने झाली रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बिबी पोलिस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील, माजी सरपंच बबन बनकर , सरपंच पुत्र दीपक गुलमोहर,अमोल मुळे,बद्रि मामा बाहेती,रमेश आंधळे, प्रवीण धाईत, निलेश भांगडीया, संदीप बनकर केशव डाहाळके, डॉक्टर असोसिएशन यांची उपस्थिती होती. रक्तदानाची सूरवात झाल्या नंतर 51 रक्तदात्यानी रक्तदान केले नंतर श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनुभाऊ कायंदे उपाध्यक्ष अभिषेक भालेराव सचिव आकाश बनकर कार्तिक धाईत चेतन ढाकणे महेश धाईत सागर मुर्तडकर गोलू मुर्तडकर विशाल मुर्तडकर, तुषार मुर्तडकर, धनु सानप, ओम मुळे, बाळू दिनोदे नूतन काळूशे यांनी सर्व रक्तदात्यांचे प्रमाणपत्र देऊन आभार मानले. त्याच प्रमाणे पूर्ण रक्तदान शिबिर पूर्णत्वास नेण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठान व श्रीराम गणेश मंडळ बिबी च्या सदस्यांनी मेहनत घेतली.