spot_img
spot_img

खा. राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप नेता तरविंदरसिंह मारवा यांना गजाआड करा! -लोणार मधून उठली काँग्रेसची मागणी!

लोणार (हॅलो बुलढाणा) तालुका कांग्रेस कमेटी व शहर कांग्रेस कमेटींच्या वतीने

खा. राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप नेता तरविंदरसिंह मारवा यांना गजाआड करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले.

दिल्ली भाजपाचा नेता व माजी आमदार तरविंदरसिंह मारवा यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते मा. खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गांधी कुटुंबाने देशासाठी त्याग व बलिदान दिले. देशविघातक शक्तींनी महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे बळी घेतले आहेत. आता पुन्हा गांधी संपवण्याची जाहीर धमकी दिली जात आहे व भाजपाचे सरकार मात्र काहीही कार्यवाही करत नाही हे अत्यंत गंभीर व आक्षेपार्ह आहे. खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपाचा माजी आमदार तरविंदरसिंह मारवा याला तत्काळ अटक करून कठोर कार्यवाही करावी अशी मागणी मा. महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांना तहसीलदार यांच्यामार्फत निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश मापारी,शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद,
ज्येष्ठ नेते साहेबरावजी पाटोळे, पंचायतराज तालुका अध्यक्ष माजी सभापती ज्ञानेश्वर चिभडे, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात, उपाध्यक्ष बादशाह खान पठाण, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सिध्दार्थ खरात,युवक काग्रेंस जिल्हा अध्यक्ष अनिकेत मापारी,ओबीसी सेल शहराध्यक्ष अंबादास इंगळे,माजी नगरसेवक शेख करामत शेख गुलाब,युवक तालुका अध्यक्ष अमोल सोनुने, उद्धव ठाकरे सेनाचे जीवन घायाळ, युवक काँग्रेस शहराध्यक्ष विकास मोरे, संजय गांधी योजनेचे सदस्य सज्जाद शेख करामत,मनीष पाटोळे,कृणा बाजड,शुभम चाटे,पवन सोनुने,शेख महेबुब,कालु माघाडे,मुरली चिभडे, निबाजी गायकवाड,पवन सोनुने,पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!