बुलढाणा (हॅलो बुलढाणा) प्रस्तावित सिंदखेडराजा ते शेगाव भक्ती महामार्गाविरोधात अद्यापही शेतकऱ्यांचा रोष शांत झाला नाही.आज भक्ती मार्ग समर्थनार्थ असंख्य शेतकऱ्यांनी रविकांत तुपकरांशी चर्चा केली.दरम्यान भक्ती मार्ग रद्द करून राज्यातील शेतकऱ्यांची जमीन घेऊ देणार नाही असा इशारा यावेळी तूपकरांनी दिलाय.
प्रस्तावित सिंदखेडराजा ते शेगाव भक्ती महामार्गाविरोधात
अनेक आंदोलने पेटले.गेल्या काही महिन्यात सुमारे शेहचाळीस गावातील शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते, विधिमंडळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी निदर्शने केली होती. २७ जूनच्या सकाळी अंत्री खेडकरसह अन्य गावात भक्तिमार्ग तातडीने रद्द करावा या मागणीसाठी थाळी बजाव आंदोलन करण्यात आले होते.शासन दरबारी आमदारांनी सुद्धा हा प्रश्न गाजवला.परंतु हा प्रश्न रेंगाळलेला आहे.रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन दरम्यान उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी बैठकीसाठी बोलाविले असता,तुपकर यांनी पवारांकडे भक्तिमार्ग रद्द करण्याची मागणी केली होती.या अनुषंगाने असंख्य शेतकऱ्यांनी आज तूपकरांना गाठले आणि निवेदन देत चर्चा केली आहे.शेतकऱ्यांचा विरोध असेल तर राज्यातील शेतकऱ्यांची जमीन घेऊ देणार नाही असा इशारा यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला.