spot_img
spot_img

EXCLUSIVE- असे “भाऊ”,अशी “ताई”….आणी असे त्यांचे कार्यकर्ते..

बुलढाणा (हॅलो बुलडाणा)‘ आटपाट गावात “भाऊ” होते त्याच आटपाट गावात “ताई” होत्या. भाऊ जन्मताच राजपुत्र होते,तर “ताई” लग्न झाल्यावर “महाराणी” झाल्या होत्या.पण ताई व भाऊ यांनी दोन स्वतंत्र ‘जहागीरदारी’ स्वीकारल्या होत्या,व त्या पैकी एकालाच एकावेळी राज्याचा राज्यकारभार पाहता येत होता कारण राज्यात मतदानाने येणारी लोकशाही होती.ताईंनी व भाऊंनी दोघांनीही आपापल्या रक्षणाकरता काही बिनपगारी मंडळी नेमलेली होती त्यांना “कार्यकर्ते” असे संबोधत असत. व्हाट्सअप नावाच्या रणभूमीवर हे कार्यकर्ते एकमेकांशी नेहमीच भिडलेले असतात.ताई भाऊ किंवा साहेबांनी केलेला ” छू” यालाच आदेश माणून हे आपले करिअर,आपले संबंध,नातेगोते, आपल्या मुलांचे,आईवडिलांचे भविष्य सगळ टांगणीला टाकू शकतात.कदाचित भाऊ,ताई किंवा साहेब त्यांच्या पिढीच्या भविष्याची करणार असतील?

1)बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचा मुलगा “नेदरलँडला” आहे, आणि त्याच्याकडे संपूर्ण युरोपचा विजा आहे.त्यांची मुलगी दिल्लीत असून त्यांनी राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये तिचे व्यवस्थित सेटलमेंट करूनन दिलेले आहे.बाप म्हणून हर्षवर्धन सपकाळ खरोखर ग्रेट आहेत.

2) बुलढाण्याचे आमदार श्री संजू भाऊ गायकवाड, यांच्याकडे पुरेशी शेतजमीन आहे व 300 प्लॉट आहेत, त्यांची पुढील राजकीय कारकीर्द सांभाळण्यासाठी त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना स्वतःच्या तालमीत घडवणे सुरू ठेवलेले आहे, संजू भाऊ चे दोन्ही मुले आपले करिअर राजकारणातच करणार हे जवळजवळ क्लियर आहे.

3) बुलढाण्याच्या विधानसभेच्या संभाव्य उमेदवार जयश्रीताई शेळके यांची मुले मुंबईमध्ये अतिशय छान शाळेत शिकतात, त्यांच्याकडेही रियल इस्टेटच्या माध्यमातून काहीशी कोटीची प्रॉपर्टी असणे सहज शक्य आहे, सोबत बँकिंग, प्रॉपर्टी व इतर व्यवसाय आहेतच, तरी एक आई म्हणून जयश्री ताईंचे आपल्या मुलांवर अतिशय छान लक्ष आहे.

4)श्री जालिंदर बुधवत यांच्याकडे शेकडो एकर जमीन असल्याचे ऐकण्यात आहे.सोबतच त्यांनी ठेकेदारी व्यवसायातून करोडो रुपये कमवलेले असतीलच.

5) श्वेताताई महाले यांनी आपल्या मुंबईतील घरात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पूजेसाठी बोलवले होते,
सध्या त्यांच्यासोबत प्रत्येक ठिकाणी त्यांचा मुलगा दिसतो, कदाचित पुढील राजकीय पिढी घडवण्यासाठी त्यांच्या मुलाचे प्रशिक्षण सुरु झाले असेल.

5) चिखलीचे माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांचा मोठा मुलगा एलएलएम करणयासाठी अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे आहे, सोबत अनुराधा परिवाराचा मोठा कौटुंबिक व्यवसाय आहेत.

6) बुलढाण्याची माजी आमदार ध्रुपदराव सावळे,यांनी आपली मुलगी कीर्तीसाठी एक इंजीनियरिंग व दोन फार्मसी कॉलेज एक बीएड कॉलेज, एक एम. एड. कॉलेज इत्यादीच्या अध्यक्षपदाची तरतूद केलेली आहे.

आता आपली मुले कोणत्या शाळेत आहेत?त्यांचे भविष्य अधिक चांगले बनवण्यासाठी आपल्याकडे काय योजना आहे?आपल्या मुलांसाठी आपल्या नेत्याकडे काय योजना आहेत? हे बघा आणी पुन्हा भांडणे सुरु करा…

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!