देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) दिल्ली भाजाचा नेता माजी आमदार तरविंदरसिंग मारवा याने लोकसभेचे विरोधी पक्ष नेते व काँग्रेस पक्षाचे नेते मा.खासदार. राहुल गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करून त्यांचा खून करण्याची धमकी दिलेली आहे. त्या विरोधात
देऊळगाव राजा तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी च्या वतिने ह्या घटनेचा तिव्र शब्दात निषेध करुन भाजपच्या इशा-या वर चालणा-या ह्या माजी आमदार तरविंदरसिंह मारवा याच्या विरोधात त्वरित गुन्हा नोंदवुन त्याला विनाविलंब अटक करण्यात यावी,अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.अन्यथा आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला.
भाजप प्रणित सरकारच्या इशा-या वरुन यात काही कार्यवाही न झाल्यास कॉंग्रेस पक्ष अधिक तिव्रतेने आंदोलन उभारेल या आशयाचे निवेदन देऊळगाव राजा तहसिलदार मा.डोंगरदिवे मॅडम यांच्या माध्यमातून सरकारला दिले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष गजानन काकड,शहराध्यक्ष विष्णु झोरे,अनिल सावजी,रमेश कायंदे,गणेश डोईफोडे,गणेश पोस्ट मास्तर,हनीफ शहा,रामदास डोईफोडे,रवी इंगळे,विजय डोईफोडे,नाजिम भाई,अमर शेटे,अशोक डोईफोडे,याकुब भाई,मुबारक खान,निखिल जायभाये,सचिन मुंढे आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.