spot_img
spot_img

ऐतिहासीक शिवस्मारकाच्या लोकार्पण सोहळा नियोजनाची शनिवारी बैठक! -बैठकीला उपस्थित राहण्याचे शिवस्मारक समितीचे आवाहन..

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या संगम चौकातील अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासीक पुतळ्याचे लोकार्पण शिवस्मारक समितीच्या वतीने १९ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार आदींच्या प्रमुख उपस्थित आयोजित करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या नियोजनासाठी आमदार संजय गायकवाड यांच्यासह शिवस्मारक समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्थानिक विश्राम भवन येथे शनिवार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या नियोजन बैठकीस शहरातील विविध गणपती मंडळ, दुर्गादेवी मंडळ, क्रिकेट टीम, ढोल पथक, शहरातील विविध क्रीडांगणाचे पदाधिकारी, ग्रामसेवक संघटना, हॅपी थॉट संघटना, मेडीकल असोसिएशन, ठेकेदार संघटना, को. ऑपरेटीव्ह सोसायटी, विविध मंदिर संस्थान, बार असोसिएशन, वकील, प्राध्यापक, योगाग्रुप, पर्यावरण संस्था, वन्यजीव संघटना, मराठा सेवा संघ, अधिकारी संघ, मराठा क्रांती मोर्चा, शिक्षक संघटना, माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, व्यापारी असोसिएशन आदी संघटनेचे पदाधिकारी तसेच शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवस्मारक समितीने केले आहे.

spot_img
spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!