बुलढाणा (हॅलो बुलडाणा) सध्या मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनार्थ गेलेल्या काही भाविकांचे डोळे रागाने ‘लाल’ झाल्याचे दिसतेय. भाविकांना राजाच्या चरणी लीन होण्यासाठी तासंतास रांगेत उभे राहावे लागते. मात्र व्हीआयपी राजकारण्यांना याच लालबागच्या राजाचे थेट दर्शन लाभतेय.शिवाय कार्यकर्त्यांकडून महिलांना धक्का बुक्की होत आहे.
त्यामुळे या मंडळाचा भेदभाव आणि मुजोरीपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.जिल्ह्यातील चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले,त्यांचे पती विद्याधर महाले यांनी नुकतेच व्हीआयपी सुविधेतून राजाचे दर्शन घेतले
मुंबईतील परळ परिसरात असलेल्या लालबागच्या राजाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.भक्तांच्या नवसाला पावणारा बाप्पा म्हणून लालबागचा राजाची सर्वदूर ख्याती आहे. यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे येतात. परंतु, लालबागचा राजाचे दर्शन घेणे, इतके सोपे नाही. अनेक तास रांगेत उभे राहिल्यानंतर भक्तांना बाप्पाची झलक दिसते.परंतु लालबाग राजाच्या मंडपात काही जण आरामशीर दर्शन घेत आहेत. तर दुसऱ्या बाजूला सुरक्षारक्षकाकडून सर्वसामान्य भक्तांसोबत मुजोरपणा सुरु आहे. या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दोन-तीन दिवसांपूर्वीचा असल्याचा सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा मुजोरीपणा कधी संपणार,असा सवाल उपस्थित होत आहे.