साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा) शिंदी येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच संदीप बंगाळे यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. शिंदी ग्रामपंचायत शिवसेना शिंदे गटाची असून नवीन उपसरपंच निवडण्यासाठी आज १२ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलण्यात आली होती. अध्याशी अधिकारी सरपंच सौ साधना अशोक खरात यांचे अध्यक्ष खाली सकाळी दहा ते बारा या कालावधीत अर्ज मागविण्यात आले होते.या कालावधीत सौ वैशाली पुरुषोत्तम खरात यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. प्राप्त झालेला अर्ज वैद्य झाल्याचे अध्याशी अधिकारी सरपंच सौ साधना अशोक खरात यांनी जाहीर केले. यानंतर दुपारी दोन वाजता विशेष सभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज वैशाली खरात यांचा प्राप्त झाल्याचे जाहीर केले व उपसरपंच पदी सौ वैशाली घरात या अविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले . यावेळी बैठकीला संदीप बंगाळे , प्रकाश खोसे , विलास गवई , इंदुबाई येरमुले , अनिता मोरे , गणेश खरात , मंदा बंगाळे , वैशाली खरात असे दहा पैकी नऊ सदस्य यावेळी हजर होते. याप्रसंगी नवनिर्वाचित उपसरपंच वैशाली खरात यांचा सत्कार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गंभीरराव खरात तंटामुक्ती अध्यक्ष परमेश्वर खरात ग्रामसचिव दिनकर काळे यांनी श्रीफळ हार व गुच्छ देऊन स्वागत केले.
- Hellobuldana