बुलढाणा (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील धाड येथील जामठी रोडवरील जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळेत दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या एका 7 वर्षीय विद्यार्थिनीला भरधाव वेगात आलेल्या दुचाकी चालकांने जोरदार धडक दिल्याने विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाली असून तिला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. 10 सप्टेंबरला सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
या घटनेनंतर संतप्त पालक शाळेत पोहोचले व त्यांनी रस्ता मोकळा करून नवीन पुल उभारण्याची मागणी करत 3 दिवस आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.धाड येथील जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळा जामठी रोडवर असून हा मार्ग अरुंद आहे. त्यामुळे शाळा भरण्याचे वेळी तसेच शाळा सुटल्यानंतर या मार्गावर विद्यार्थ्यांची रेलचेल असते अशा अनेक वाहनधारक वेगात या मार्गाने जातात अनेक छोटे-मोठे अपघात यापूर्वी देखील घडले आहे. मंगळवारी सकाळी इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी माहेरा इरम मोहम्मद अल्ताफ ही शाळेत जात असताना शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच जामठी कडून आलेली एका भरधाव दुचाकीने या विद्यार्थिनीला जोरदार धडक दिली. यात ती गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात पालक शाळेत पोहोचले होते. हा रस्ता मोठा करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.














