लोणार (हॅलो बुलडाणा/राहुल सरदार) आगामी सण उत्सव काळात नागरिकांनी सामाजिक. ऐक्य जपत गुण्या गोविंदाने सन उत्सव साजरे करावेत व शहराची व तालुक्याची शांतता आबाधीत ठेवावी व पोलीस प्रशासन सहकार्य करावे
यामध्ये प्रामुख्याने जातीय.तेढ निर्माण करणाऱ्यावर पोलीस प्रशासनाची करडी नजर आहे. अशा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा लोणार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांनी स्थानिक लोणार पोलीस स्टेशन येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत दिला.
आगामी सण उत्सव ज्यात प्रामुख्याने गणेशोत्सव मुस्लिम धर्मियांचे पवित्र ईद ए मिलाद दुर्गा उत्सव अशा धार्मिक सणांची रेलचेल असून यामध्ये प्रामुख्याने समाज माध्यमावर धार्मिक भावना भडकवणारे मेसेज कोणी करू नये तसे आढळून आल्यास त्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल असे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत सांगितले. त्याचबरोबर गणेशोत्सव व दुर्गा उत्सव असो व अन्य धार्मिक मिरवणूक पोलीस प्रशासनाने ठरवून दिलेल्या मार्गावरूनच काढण्यात यावी अन्य कुठल्याही मार्गाने काढू नयेत व शहराची व तालुक्याची शांतता अबाधित ठेवत एकोप्याने सण उत्सव साजरे करावेत असेही मेहेत्रे यांनी सांगितले.
या शांतता कमिटीच्या बैठकीला लोणार नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष बादशाह खान, पठाण, एम ए नसीम,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक महेमुद शेठ, विकास मोरे, डॉ.भास्कर मापारी, लूकमान कुरेशी,अनसरसह शांतता कमिटीचे अनेक सदस्य उपस्थित होते.