मलकापुर (हॅलो बुलढाणा/ रविंद्र गव्हाळे) सरकार केवळ योजनांची घोषणा करते.परंतु प्रत्यक्षात योजनेचा लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहोचतो का?हा कळीचा मुद्दा असून अनेक शेतकरी लाभापासून वंचित असल्याने संतप्त शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने आज दि.10 सप्टेंबर रोजी रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून त्यांच्या अडचणी सोडविण्याबाबत निवेदन दिले.
मागील शेतकऱ्यांना सन 2023/2024 मधील पिक विमा ताबडतोब देण्यात यावा व कापुस तसेच सोयाबीनचे मंजुर केलेला भाव फरक अनुदान हेक्टरी 500 हजार रुपये अजुन देण्यात आले नाही ते देण्यात यावे व पंतप्रधान सन्मान निधी व महाराष्ट्र शासनाचा नमो सन्मान निधी कित्येक शेतकऱ्यांना मिळत नाही तरी त्याबद्दल संबंधीत अधिकारी यांना सुचना देऊन वंचीत असलेले शेतकरी यांना वरील निधी उपलब्ध करून द्यावा तसेच ई पिक पाहणी नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस न धरता पटवारी यांना बांधावर जाऊन ई पीक नोंदणी करण्यात यावी तसेच या वर्षी सुद्धा जास्त पावसामुळे शेतकऱ्यांचे कापुस सोयाबीन तुर खराब झाले आहे सोयाबीनला शेंगा लागल्या नाही तरी याचे पंचनामे करून ओला दुष्काळ घोषणा करण्यात यावा तसेच ग्रामीण भागातील शिव रस्ते व पांदन रस्ते मोकळे करून या रस्त्याचे व्यवस्थीत काम करण्यात यावे तसेच पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना 72 तासाचे आत तक्रार करण्याची अट शिथील करण्यात यावी शेतकऱ्यांना या अटी व शर्थी कळत नसल्यामुळे पिकविमा मिळत नाही सोयाबीन हमी भावापेक्षा कमी दराने विकत आहे तरी हमी दराने सोयाबीन पुर्ण खरेदी करावी या सर्व अडचणी दुर करण्यात याव्यात अन्यथा ना ईलाजाने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल त्यानंतर होणाऱ्या परिथितीला शासन जबाबदार राहीण निवेदन देते वेळी शेतकरी संघटनेचे नेते कार्य करते यांनी निवेदनावर सार्वांनी सह्या करून निवेदन देण्यात आले. शेतकरी संघटनेचे युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष रणजितभाऊ डोसे यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटनेचे नेते दामोदर शर्मा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रतापसिंह राजपुत, युवा आघाडी तालुकाध्यक्ष रितेश महाराज पाटील,बाबुराव पाटील, दिलीप सिंह राजपुत, आत्माराम तायडे, सोपानभाऊ सपकाळ, सुरेश भाऊ संबारे, गोपाल सातव, सैय्यद याशिन सैय्यद हुशेन निवेदन देताना उपस्थित होते.