spot_img
spot_img

मरणासन्न अवस्थेतील त्या सहकारी सूतगिरणीला संजीवनी मिळेल का? -स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सवाल!

मलकापूर (हॅलो बुलढाणा/करण झनके) मलकापूर येथील वीर जगदेवराव सहकारी सूतगिरणी जगप्रसिद्ध असून ही सूतगिरणी सध्या मरणासन्न अवस्थेत असून या सूतगिरणीला संजीवनी देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रेटली आहे.

मलकापूर ही बाजारपेठ कापसासाठी जगप्रसिद्ध बाजारपेठ असून मलकापूर नजीकचे संपूर्ण जमिनीचे क्षेत्र कापसासाठी
प्रसिद्ध आहे.
वीर जगदेवराव सहकारी सूतगिरणी ही इंग्रजांच्या काळातील संकल्पना असून गेली 25 ते 30 वर्षे झाले ही सूतगिरणी मरणावस्थेत पडलेली आहे. जुन्या लोकांनी घामाच्या रक्ताच्या थेंबातून तयार झालेली ही सूतगिरणी मलकापूर नांदूरा येथील काही विशिष्ट पुढार्‍यांनी या सुतगिरिणीला मातीत घालण्याचे काम केलेले आहे. तसेच या सूतगिरणीच्या भरोशावर 2000 ते 2500 कामगारांचा संसार उघड्यावर पडल्यामुळे आर्थिक जीवनाचे नुकसान झालेले आहे. ज्या पुढार्‍यांनी या सूतगिरणीला मातीत घालण्याचं काम केलेलं असेल त्यांना या भागातला शेतकरी जनता कधीच माफ करणार नाही,अशा शब्दात स्वाभिमानी संघटनेने आपला रोष व्यक्त केला.ज्यावेळेस सूतगिरणी बंद पडली त्यावेळेच्या संचालक मंडळाची एसआयटी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करून सुतगिरिणीला शासनाने योग्य निधी देऊन शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा आणि सूतगिरणी पूर्ववत सुस्थितीत सुरू करण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली आहे. शेतकऱ्यांना व कामगारांना न्याय देण्याचे काम शासन प्रशासनाने करावे जेणेकरून या भागात जग्गू डॉन व पप्पू डॉन सारखे दलाल उदयास येणार नाहीत अन्यथा सबंध शेतकऱ्यांना रस्त्यावर आणून राज्यभर आंदोलनाचा वनवा पेटवण्याचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येईल अशा इशाऱ्याची निवेदन तहसीलदार यांना आज देण्यात आले. निवेदन देतेवेळी निलेश नारखेडे, सचिन शिंगोटे, दादाराव भाऊ जुनारे, सुरेशभाऊ मराठे, प्रमोदभाऊ वनारे सह इतर कार्यकर्ते हजर होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!