spot_img
spot_img

अघोरी!घरातल्या ‘महालक्ष्मी’च्या हुंड्यासाठी वाट्टेल ते..! -बाळ देऊ शकत नसल्याने जादूटोण्यासाठी बळी देण्याची धमकी.. -बिछान्यावर लिंबू जादूटण्याचे साहित्य टाकले..गरम पाण्यात सोडला करंट.. -सासरच्या मंडळी विरुद्ध 7 जणांवर विविध गुन्हे दाखल!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) विज्ञानवादी विचारांच्या प्रसारासाठी प्रयत्न केले जात असताना आणि जादुटोणाविरोधी कायद्यासारखे शस्त्र अस्तित्वात आले असतानाही काल देऊळगाव राजा येथे विवाहितेला हुंड्याच्या मागणीसाठी व बाळ देऊ शकत नसल्याने जादूटोण्यासाठी बळी देण्याची धमकी देत बिछान्यावर लिंबू गंडे टाकत गरम पाण्यात विजेचा करंट सोडणाऱ्या एकमेकांचे नातेवाईक असलेल्या 7 लालची आरोपींविरोधात काल विविध कलमानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रानुसार,पीडित विवाहिता ही सध्या माहेरी
वडिलांच्या घरी देउळगांव राजा येथे राहते. पीडितेने पोलिसांना 9 सप्टेंबर रोजी फिर्याद दिली की,तवक्कल नगर,टिपु सुलतान चौक,धाड,जि. बुलढाणा येथे माझे सासर आहे. परंतु माझ्या पतीसह नातेवाईक असलेल्या 7 जणांनी मला वेळोवेळी वेगवेगळ्या कारणा करीता पैश्याची मागणी करुन व लग्नात हुंडा कमी दिला या कारणावरुन शारीरीक व मानसिक त्रास दिला. तर 7 आरोपीपैकी पतीसह 4 जणांनी हद्दच पार केली. पतीने फिर्यादी हिचे मर्जी विरुध्द अश्लील चित्रफित दाखविले, तसेच आरोपी दुसऱ्या आरोपी हिने फिर्यादीस तु आमच्या घराला मुल देऊ शकत नाही तर मग तुझा बळी जादू टोण्याच्या वापरा करीता करते असे म्हणुन फिर्यादीचे बिछाण्या जवळ लिंबु व इतर अघोरी प्रथाचे साहित्य टाकले. पिडीतेच्या बोटाला चाकु मारुन तसेच फिर्यादीने शेगडीवर पाणी तपविण्यासाठी ठेवले असता आरोपी 4 आरोपींनी त्या पाण्यात विजेचा करंट सोडल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे.हा सर्व अघोरी प्रकार मे 2021 ते 10 जून 2024 दरम्यान घडत होता. 9 सप्टेंबरला फिर्यादीने देऊळगाव राजा पोलिसांकडे ही तक्रार नोंदविली.दरम्यान पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध अप नं. 349/2024 कलम 498 (अ), 351, 354, (A) (1) (iii), 504, 506, 34 भारतीय दंड संहीता 1860 सहकलम मुस्लीम महीला विवाह अधिकार संरक्षण अधिनियम 2019 कलम 3 तसेच सहकलम महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ
उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 कलम 3(2)(3) तसेच सहकलम हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 कलम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपासठाणेदार महल्ले यांच्या मार्गदर्शनात पोउपनि भारत चिरडे करीत आहे.

▪️ असे आहेत आरोपींची नावे. 

1.) मोहम्मद शहबाज मो. इकबाल (तक्रारदारचे पती)
2.)मोहम्मद इकबाल मोहम्मद यासीन (तक्रारदाराचे सासरे) 3. शेबानाबी मोहम्मद
इकबाल तक्रारदाराची सासु 4.) मोहम्मद शाहादात मोहम्मद इकबाल तक्रारदाराचे दीर 5.) सलमा परवीन मोहम्मद शाहदाब तक्रारादाराची जाउ 6.) सबा अज्जुम मोहम्मद अतिक तक्रारदाराची नणंद अशी आरोपींची नाव आहे. गैरअर्जदार क्रं 1 ते 6 सर्व
रा. तवक्कलनगर टिपु सुलतान चौक धाड जि.बुलढाणा व 7.) रमीजा परवीन अक्रम खान तक्रारदाराचे नणंद रा.गैबीपुरा, रिसोड ता. रिसोड जि. वाशीम यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

spot_img
spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!