spot_img
spot_img

हाथभट्टीदादा एमपीडीए कायद्यान्वये एका वर्षासाठी स्थानबध्द!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गावठी दारू अवैधपणे विक्री करणाऱ्या जानेफळ पोलीस ठाणे अंतर्गत एका हाथभट्टीदादाला एमपीडीए कायद्यान्वये एका वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे.मुलचंद रामा जाधव, रा. मोहना बु.असुया आरोपीचे नाव आहे.एलसीबीच्या पथकाने अटकेची कारवाई केली आहे. सन उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील गुन्हेगार पोलिसांच्या रडावर आहेत.
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे सर, अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशाने दिनांक 9 सप्टेंबर रोजी पो स्टे जानेफळ अभिलेखावरील हाथभट्टी दादा मुलचंद रामा जाधव, रा. मोहना बु. यास MPDA कायद्यान्वये अटक करून 1 वर्षांकरिता स्थानबद्ध करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी पारित केला होता.दरम्यान एलसीबीने त्याला ताब्यात घेऊन बुलढाणा जिल्हा कारागृहात टाकण्यात आले आहे. 3 आठवड्यानंतर आरोपीला अकोला कारागृह येथे दाखल करण्यात येईल.सदर एलसीबीच्या कारवाईने अळीवात धंदे करणाऱ्या दादांचे धाबे दणाणले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!