लोणार (हॅलो बुलढाणा/राहुल सरदार) अलीकडे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रमाण काही कमी होत नाहीये. महिला,युवतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आ वासून उभा असताना लोणार तालुक्यातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तीला कुमारी माता बनवत मातृत्व लादल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेबाबत पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी महादेव केशव थापडे रा गुंधा विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीने अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून बळजबरीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले व या बाबत बाहेर वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. त्यामुळे सदर अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली व तिने एका बाळास जन्म दिला. दरम्यान आरोपींविरुद्ध लोणार पोलीस स्टेशन मध्ये अपराध क्रमांक २७१/२०२४ कलम ३७६, ३७६ (२) (j) ,४५२ ,५०६ भादवी सह कलम ४,५,(जे) (२), ६ लैंगिक बालकाचे अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखलपुण्यात आला. आरोपीला अटक करत न्यायालया समोर उभे केले असता ४ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गोपाल राठोड जमादार पंडित नागरे करीत आहेत.










