बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ना पद ना अधिकार तरी राजकीय नेत्याच्या नातेवाईक आणि कार्यकर्त्यांना ‘मंत्री किंवा आमदार झाल्यासारखं वाटत आहे. रस्त्यावर खुलेआम नियमबाह्य आमदार, खासदारांची स्टिकर लावून वाहने दामटली जातेय.दरम्यान केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रतापराव जाधवांची फॅन्सी नंबर असलेली फॉर्म्युनर ही आलिशान गाडी छत्रपती संभाजी नगर पोलिसांनी8 सप्टेंबरला दुपारी अडवून चालक आणि शेजारी बसलेल्या व्यक्तीने मंत्र्यांची गाडी आहे म्हणून पोलिसांनाच दमदाडी करत मगरूळी केल्याने पोलीस उप आयुक्तांनी दीड हजाराचा दंड भरल्याशिवाय गाडी हलू दिली नसल्याची बाब समोर आली आहे.
‘हॅलो बुलढाणा’ च्या निदर्शनास असे आले की, 90 टक्के आमदार खासदार मंत्र्यां शिवाय त्यांचे नातेवाईक आणि कार्यकर्ते वाहने वापरतात.काही महाभाग तर आमदार किंवा खासदारांचे वाहनांवर फोटो, स्टिकर लावून त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी असल्याचे भासवतात.वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन सर्रास करतात.मात्र याकडे आरटीओ विभाग आणि पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष दिसून येते.असाच प्रकार छत्रपती संभाजी नगरात समोर आला. बुलढाण्यातील केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांची फॅन्सी नंबर असलेली फॉर्म्युनर पोलिसांनी क्रांती चौकात ८ सप्टेंबरला दुपारी साडेचारला अडवली.वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनधारकांवर क्रांती चौकात पोलीस कारवाई सुरू होती. दरम्यान केंद्रीय मंत्र्यांची काळ्या रंगाची अशोक स्तंभाचे स्टिकर लावलेली अलिशान फॉर्च्यूनर (क्र. एमएच २८ बीडब्ल्यू
८८) अडविण्यात आली. गाडीवर फॅन्सी नंबर प्लेट लागलेली पाहून पोलीस उपायुक्त नितिन बगाटे यांनी गाडी अडवून वाहतूक कर्मचाऱ्यांना दंड ठोठावण्याचे आदेश दिले.मात्र, चालक वशेजारील
व्यक्तीने गाडीतूनच खासदार साहेबांची गाडी असल्याचे मग्रुरीने सांगितले.चालकाशेजारील व्यक्तीने तो खासदारांचा भाचा असल्याचेही सांगितले.त्यांची भाषा ऐकून मग पोलीस उपायुक्त बगाटे यांनी आधी दंड भर, मग जा, असे स्पष्टपणे खडसावले. दीड हजारांच्या दंडासाठी खासदारांचा भाचा सांगणाऱ्याने त्याच्या मोबाइलवरून १५ मिनिटे कॉल लावून बगाटे यांच्याकडे मोबाइल देण्याचा प्रयत्न केला.पण बगाटे जुमानले नाही. अखेर त्याने दीड हजार रुपये रोख भरले आणि गाडी तिथून पुढे हलली.