मलकापूर (हॅलो बुलढाणा/रविंद्र गव्हाळे) विदर्भ पंढरी शेगाव येथे आज रविवारी गजानन महाराज ऋषिपंचमी निमित्त भाविकांची गर्दी उसळली तर या अनुषंगाने विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर मधील प्रति शेगाव अर्थात घिर्णी येथील गजानन महाराज मंदिर देखील भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.
संत गजानन महाराजांच्या शेगाव नगरीत पुण्यतिथी सोहळा आज संपन्न झाला.विदर्भासह राज्यातील अन्य भागांतून शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्याने मंदिर परिसर व रस्ते आबालवृद्ध भाविकांनी फुलल्याचे दिसून आले.त्याचप्रमाणे विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर मधील घिर्णी या गावात संत गजानन महाराजांचे मंदिर आहे.या मंदिरात बुलढाणा जिल्ह्यातील हजारो भाविकांनी आज दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान मंदिराच्या आवारामध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले. यामध्ये कृष्ण हॉस्पिटल मलकापूर येथील डॉ प्रतिक्षा देशमुख स्रीरोग तज्ञ यांनी संपूर्ण दिवस आलेल्या रुग्णांची निशुल्क तपासणी करून औषध उपचार केले.दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.