spot_img
spot_img

बुलढाण्यात ‘मोगरा फुलणार!’ -गणेशोत्सवा निमित्त संगीतमय निरूपण ‘मोगरा फुलला’ कार्यक्रमाचे आयोजन! -भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याची बुलढाणा अर्बनचे आवाहन!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गौरी गणपतीच्या या उत्साही काळात चैतन्याचे धुमारे फुटताहेत..श्री गणेशाच्या शुभागमना पाठोपाठ महालक्ष्मी देखील माहेरी येतअसल्याने हा उत्सव अधिक भक्तिमय करण्यासाठी बुलढाणा अर्बन परिवाराने दिनांक 14 ,15 व 16 सप्टेंबरला संध्याकाळी सात ते दहा पर्यंत येथील गोवर्धन इमारतीच्या सभागृहातील तिसऱ्या मजल्यावर महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते,प्रवचनकार व कथाकार श्री गणेश शिंदे यांचा संगीतमय निरूपण ‘मोगरा फुलला’हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सध्याच्या भौतिक जगात आपण बरेच काही कमविले असले तरी मानसिक समाधान व शांती गमावली असल्याची वस्तुस्थिती आहे. मनाच्या समाधान आणि शांती साठी चित्त स्थीर असणे गरजेचे आहे. स्थीर चित्त ठेवण्यासाठी संत विचार समजावून घेण्याशिवाय तरणोपाय नाही.यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते,प्रवचनकार व कथाकार श्री गणेश शिंदे यांचा संगीतमय निरूपण ‘मोगरा फुलला’ या कार्यक्रमाचे आयोजन बुलढाणा अर्बन परिवारा तर्फे श्री गणेशोत्सव निमित्ताने करण्यात आले आहे.तरी सहकुटुंब व इष्टमित्रांसह दिनांक 14 ,15 व 16 सप्टेंबरला संध्याकाळी 7 ते 10 पर्यंत गोवर्धन ईमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात
(लिफ्ट सुविधा आहे) आयोजित करण्यात आलेल्या या अध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन बुलढाणा अर्बन चे अध्यक्ष श्री राधेश्याम चांडक यांनी केले आहे.

spot_img
spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!