बुलढाणा (हॅलो बुलडाणा) पानंद रस्त्याच्या संदर्भात करोडो रुपयांच्या खर्च झालेला असताना,आमदार श्वेताताई महाले यांनी तहसीलदारांचा हवाला देऊन,पानंद रस्त्यावर एकही रुपयाचा खर्च झालेला नाही असे धडधडीत खोटे सांगितले,राजकारण्यांना आपली कातडी सांभाळण्यासाठी कधी कधी खोटे बोलावे लागते हे गृहीत धरले तरी,राजपत्रित अधिकारी असलेले चिखली व बुलढाणा येथील तहसीलदार यांनी जनतेची दिशाभूल करण्यासाठी आमदारांनी दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवली,पण “कोंबडं आरवल नाही म्हणून उजाडायचे थोडीच बाकी राहते?” आता जिल्हाधिकाऱ्यांनीच आपल्या दोन्ही तहसीलदारांचा खोटारडेपणा उघड पाडला आहे.जिल्ह्यातील 350 पानंद रस्त्याच्या कामात अनियमिता असून सार्वजनिक बांधकाम विभागाने घालून दिलेल्या मापदंडाप्रमाणे यांचे काम पूर्ण झालेले नाही.त्यामुळे या योजनेच्या मूळ उद्देशाला मूठ माती मिळाली व शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न जो कायमस्वरूपी सुटला असता,तिथे थातूरमातूर काहीतरी कामे करून देण्यात आलेली आहेत.त्यामुळे आधीच कठीण असलेली शेतकऱ्यांची वाट या पानंद रस्त्यातील भ्रष्टाचाराने अधिक बिकट करून टाकली आहे.त्यामुळे या योजनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे असे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी मागणी केली आहे.
मातोश्री पानंद रस्ते योजना 2021 मध्ये सुरू झाली. जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या अधिकारात 2023-24 या कार्यकाळातील रस्त्यांचे खर्च दाखवण्यात आले असले,तरी बऱ्याच रस्त्यांची व काढलेल्या बिलांची माहिती अजून मिळालेली नाही.त्यामुळे हा प्रकार वाटतो तेवढा सोपा नसून हे प्रकरन बरेच खोल असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यामध्ये सर्वात गंभीर बाब ही की चिखली व बुलढाणा येथील तहसीलदारांनी, संविधानिक राजपत्रित पदावर काम करताना जनतेचि दिशाभूल करण्यासाठी कुण्या लोकप्रतिनिधींच्या तालावर नाचायला नको होते.आमदार ,दोन तहसीलदार यांना जर या प्रकरणांमध्ये खोटे बोलावे लागत असेल तर “पाणंद रस्त्यात किती पाणी मुरत असेल” असे राहुलभाऊ बोन्द्रे यांनी सांगितले.
पानंद रस्त्याच्या कामामध्ये चिखली तालुक्यातील 56 व बुलढाणा तालुक्यातील 40 गावामध्ये कामे झालेली असून,पैसेही काढण्यात आलेले आहेत.तरी ज्या गावामध्ये काम न करताच पैसे काढलेले असतील अशा गावातील जनतेने चिखली येथे राहुलभाऊ बोन्द्रे यांच्या जनसेवा कार्यालयाला संपर्क करावा असे आवाहन राहुलभाऊ बोन्द्रे यांच्याकडून करण्यात आले आहे.