spot_img
spot_img

पॉलिटिक्स विशेष! ‘लाडक्या खुर्ची’ वर हौशां- गौशां- नवशांचा डोळा!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा/प्रशांत खंडारे ) सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याच्या पूर्वीच गेल्या महिन्यांपासून ‘लाडक्या खुर्चीसाठी’ राज्य सरकार योजनांच्या घोषणांचा पाऊस पडत असून, जिल्ह्यातील आमदारकीचे ‘हसीन सपने’ पाहणारे देखील ‘चमकोगिरी’च्या पुरात वाहताहेत. एकंदर इच्छुक उमेदवारांसह तयार झालेले रेडीमेड कार्यकर्ते व रेडिमेट नेते ‘लाडकी खुर्ची’ बळकवण्यासाठी सक्रिय झाल्याचे दिसतंय!

आजी-माजी आमदारांतच नव्हेतर स्वेच्छा निवृत्ती घेऊन सामाजिक कार्यकर्ते,संघटनांचे पदाधिकारी व साधी सरपंचाची निवडणूक ही ना जिंकलेल्या हौशा गौशांनी आगामी विधानसभा निवडणुकीत जिंकण्यासाठी धडपड सुरू केलीय. लोकसभेतील बऱ्यापैकी निकालामुळे काँग्रेस,उबाठा शिवसेनेमध्ये अनेकांनी पक्ष प्रवेश केला तर काहींची पक्षश्रेष्ठींकडे बोलणे सुरू आहे.निवडणूक लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.परंतु राजकीय दृष्ट्या अस्तित्व निर्माण करता आले पाहिजे.जिल्ह्यात मात्र उठसूट कोणीही स्वतःला गाव पुढारी समजतोय. मिसरूड न फुटलेला तरुण कार्यकर्ता बनतोय. अधिकाऱ्यांना धारेवर धरायला पाहतोय.आंदोलन करतोय.निवेदन देतोय.कारण आता काळ बदलला असून कार्यकर्ता किंवा नेता म्हणून प्रामाणिक लोकांची सेवा करण्याची गरज नाही.नेत्यांच्या मागे पुढे फिरा त्यांची चाटूगिरी करा.एखाद्याचा वाढदिवस किंवा अन्य महत्व नसलेल्या कामाचे मोठे डिजिटल बॅनर्स रातोरात लावायचे,त्याचे फोटो,व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करायचे, प्रसंगी पाकीट कूसंस्कृतीतून प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचाही वापर करायचा असा चमको कार्यक्रम सुरू आहे.अलीकडे
उलट सुलट धंदे करून माल कमवा आणि निवडणुकीत ‘माल लावा, माल कमवा’ हा धंदा प्रतिष्ठितेचा होत असल्याचे दुर्दैवी दृश्य आहे.जुना इतिहास पाहिला तर पूर्वीच्या काळात सर्व क्षेत्रात प्रत्येकाला उमेदवारी करावी लागे.सार्वजनिक उपक्रम राबवावे लागत आणि त्यातून कार्यकर्ता आणि मग नेता निर्माण होत असे!आता मात्र रेडिमेट कार्यकर्ते आणि रेडिमेड नेते तयार होऊ लागलेत.’खुर्ची’ लाडाची झाली आहे.चमकोगिरी वाढली आहे. प्रसिद्धीसाठी राज्य सरकार देखील पाण्यासारखा पैसा ओतत असून तिजोरीत ठणठणाट करीत असल्याचा विरोधक आरोप करताहेत. सुज्ञ नागरीक या विधानसभेच्या निवडणुकीची ही कवायत मात्र ओळखून आहेत, ते दूधखुळे थोडीच आहेत?

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!