लोणार (हॅलो बुलढाणा/यासीन शेख) ‘लाखो रुपयांच्या रस्त्याचे भवितव्य धोक्यात!’या मथळ्याखाली ‘हॅलो बुलढाणाची’ बातमी उमटताच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. सदर रस्त्यावरील मोठाले खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले.श्री गणेश आगमनापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला हात घातल्यामुळे ‘हॅलो बुलढाणाचे’ आभार व्यक्त होत आहे.
लोणार शहरात मंठा रोड पासून माळीपुरा, गुलाबखा मोहल्ला या रस्त्याने आठ दिवस आधी एअरटेल कंपनीच्या टावरसाठी केबल टाकण्याकरिता खोदलेल्या नालीची ठेकेदाराने व्यवस्थित दबाई केली नव्हती. लाखो रुपयांचा रस्ताच खोदून काढला होता. या रस्त्याचे भवितव्य धोक्यात येऊन होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांच्या जीवावर देखील गदा आली होती. आधीच भूमिगत गटार पाईपलाईन खोदण्यात आली होती.त्यावर भरीसभर म्हणून टॉवरची केबल टाकण्यासाठी आणखी रस्ता खोदण्यात आला होता.या संदर्भातील सडेतोड वृत्त ‘हॅलो बुलढाणा’ ने प्रकाशित केले असता,रस्त्यावरल खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.