बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सर्वत्र श्री गणेशाचे जल्लोषात आगमन होत असताना, शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालयातही मंगलमय व भक्तीमय वातावरणात श्री गणेश विराजित झाले.श्रींच्या विधीवत प्राणप्रतिष्ठेनंतर ‘बळीराजाला सुखी कर..असे साकडे घालत ‘मला जनसामान्यांची सेवा करण्याचे बळ दे!’अशी प्रार्थना आमदार गायकवाड यांनी केली.
यावेळी सर्व उपस्थित मित्रपरिवारासोबत श्री गणरायाचा जयघोष करत गणपतीची प्रतिष्ठापना केली.
आज गणेश चतुर्थी निमित्त घराघरात आणि मनामनात असणारे लाडके बाप्पा घरोघरी विराजमान झाले आहेत.शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात देखील श्री गणेशाचे थाटामाटात आगमन झाले.यावेळी सर्व उपस्थित मित्रपरिवारासोबत श्री गणरायाचा जयघोष करत गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
या मंगलप्रसंगी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, प्रवीण जाधव, विजय काळवाघे, प्राध्यापक अनिल रिंढे,निलेश पाटील, योगेश परसे, भारत शेळके,विशाल शेळके,निलेश जगताप, स्वप्निल वर्मा,गौरव टाकसाळ,चेतन आंबेकर,शुभम मोहोळ,संतोष जाधव,योगेश ढवळे,अमोल चेके,सचिन रिंढे, ज्ञानेश्वर खांडवे, शंकर शेळके, सचिन कोठाळे,रोहित गवळी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.