बुलढाणा (हॅलो बुलढाणा ) आज गणेश चतुर्थी!गणेश उत्सव जल्लोसात साजरा होतोय.या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेने शांतता कमेटीची बैठक आयोजित केली होती.या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व् पानसरे यांनी यापुढे सार्वजनिक उत्सवामध्ये कायद्याने डीजे वाजविण्यावर बंदी असल्याने कोणीही डीजे वाजवू नये. 75 डेसिबल जरी ठरवून दिले असले तरी त्याचे पालन होत नाही, त्यामुळे डीजेवर बंदी घालण्यात येत आहे.अशी मार्गदर्शक सूचना एसपींनी केली.यावेळी
पारंपारीक वाद्य लावून उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.
दरवर्षी गणेशोत्सवात पारंपारिक वाद्य, स्पीकरच्या आवाजाच्या मर्यादेचा विषय चर्चेला येतो. ‘अवाज वाढव डीजे,’ ‘झिंग झिंग झिंगाट’ अशा धडाकेबाज गाण्याने शहर व ग्रामीण भागात धुम केली आहे. मात्र आता डीजेचा आवाज वाढविणे किंवा गणपती व दुर्गोत्सवाच्या मिरवणुकीत डीजे लावणाऱ्या मंडळाना चांगलेच महागात पडणार आहे. डीजे लावणाऱ्या मंडळांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.कोणताही सण-उत्सवात मोठ्या प्रमाणात डीजेचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 ध्वनीप्रदुषन विनियमन व नियंत्रण नियमावली 2000 अन्वये डीजेवर बंदी घातली आहे. मात्र उत्सव काळात आदेशाची अवहेलना करत अनेक हौशी तरूण डीजेच्या तालावर धुम करताना सातत्याने दिसत.परंतु आता नवी एसपी विश्व पानसरे यांनी बुलढाणा जिल्ह्यात डीजेवर बंदी घातली असून यापुढे कोणत्याही उत्सवात डीजे वाजवू नये असा इशारा शांतता समितीच्या बैठकीत गणेश मंडळांना दिला आहे.