spot_img
spot_img

रस्त्यात मोबाईलवर बेसावध बोलण्याचा नाद नकोय! -दुचाकीस्वार चोरट्याने महागडा मोबाईल हिसकावला!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) जिल्ह्यात मोबाईल चोर सक्रिय आहे. शिताफीने मोबाईल चोरी तर होतच आहे परंतु आता चोरांचे धाडस एवढे वाढले की ते दुचाकीवर स्वार होऊन थेट हातातून मोबाईल हिसकावून घेत सुसाट पळ काढत आहेत.अशी घटना आज 7 सप्टेंबरला देऊळगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत समोर आली.एका व्यक्तीचा 17500 रुपयांचा मोबाईल दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावला.

आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत.चोरटे लक्ष चुकून गर्दीचा फायदा घेत मोबाईल ढापत असल्याचे दिसून येत आहे.आता तर दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र म्हणा की महिला पुरुषांच्या हातातील महागडे मोबाईल हिसकावण्याचे प्रकार वाढले आहेत.देऊळगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत अशी एक घटना आज घडली.फिर्यादी प्रदीप एकनाथ आंभोरे रा.उदयनगर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.अंभोरे हे चिखली ते संभाजीनगर जाणाऱ्या एसटी बस मध्ये प्रवास करीत होते.प्रवासादरम्यान एसटी बस देऊळगाव मही जवळील प्रसाद हॉटेल जवळ थांबली.

यावेळी प्रदीप एकनाथ आंभोरे बाथरूम कडे जाण्यासाठी रस्त्यावर मोबाईल ने बोलत जात असताना,अचानक अज्ञात चोरट्यांनी दुचाकी वर येऊन बळजबरीने त्यांच्या हातातील 17500रुपयांचा मोबाईल हिसकावून देऊळगाव मही कडे पोबारा केला.याप्रकरणीअज्ञात आरोपी विरुद्धकलम 309 (4),3(5) बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास ठाणेदार संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात सपोनि हेमंत शिंदे करीत आहेत. दरम्यान पोलीस यंत्रणेने मोबाईल चोराविरुद्ध मोहीम उघडण्याची गरज निर्माण झाली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!