बुलढाणा (हॅलो बुलढाणा) स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा सपाटा लावला असून, आज 7 सप्टेंबर रोजी मलकापूर पोलीस स्टेशन अंतर्गत जबरी चोरीतील आरोपीला गजाआड करण्यात आले. प्रसाद उर्फ परेश संजय महाजन वय 27 राहणार जळगाव खान्देश असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी ऋतुजा व्यवहारे मलकापूर यांनी 29 जानेवारीलाफिर्याद दिली होती की, स्कूटीने जात असताना,मागून येणाऱ्या दुचाकी वरीलअज्ञात चोरट्यांनी गळ्यातील 40 ग्रॅम वजनाची सोन्याची पोतडिस्काउंट ओबरा केला होता.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानेपोलिसांचा तपास सुरू होता दरम्यान या गुन्ह्यातील आरोपीला जळगाव खान्देश जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.प्रसाद उर्फ परेश संजय महाजन वय 27 राहणार जळगाव खान्देश असे आरोपीचे नाव आहे.चोरी गेलेला आणि गुन्ह्यातील वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत.पुण्यातील आणखी एक आरोपीचा शोध घेण्यात येत असून ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे अशोक लांडे यांच्यानेतृत्वात पथकाने केली आहे.










