शेगांव (हॅलो बुलढाणा) सध्या महाराष्ट्रात 12 जिल्ह्यात भाट समाज संघटन कार्यरत असून उर्वरित 5 जिल्ह्यात लवकरच संघटन बांधणी करण्यात येणार असून भाट समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द आहे. असे प्रतिपादन प्रदेश अध्यक्ष विनायकराव सूर्यवंशी यांनी केले.
नुकतेच श्री क्षेत्र शेगाव येथे महाराष्ट्रातील भाट समाज जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेश अध्यक्ष विनायकराव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रदेश महासचिव अरविंद शिंदे व कार्याध्यक्ष दीपक साळवी उपस्थित होते.
यावेळी आयोजित बैठकीत समाजाचे सर्वांगीण विकासाचे दृष्टीने विविध योजना बद्दल विचार विनीमय करण्यात आला. यात प्रामुख्याने महिला व युवा सक्षमीकरण , शैक्षणिक उपक्रम , वैद्यकीय सुविधा , रोजगार निर्मिती , वंशावळ लेखन व वंशावळ पोथ्याचे जतन व प्रसार होण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणे, वंशावळ परिषद आयोजित करणे , अशा अनेक विषयांवर यावेळी विचारमंथन करून निर्णय घेण्यात आले. येत्या डिसेंबर २५ मध्ये शेगाव येथे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन व वधू वर परिचय मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी अरविंद शिंदे यांनी त्याच्या मातोश्रीच्या स्मृती प्रित्यर्थ समाजातील दहावी चे विद्यार्थी करिता प्रभाई विद्वत्ता शिष्यवृत्ती जाहीर केली.
यावेळी राज्य खजिनदार यशवंत जगताप, उपाध्यक्ष , जनार्दन परिहार, सचिव राहुल चोपडे , मधुकर पुजारी , महिला संघटक सौ. ज्योती निचळ,सौ. वैशाली बाविस्कर, सौ. अर्चना साळवी आरक्षण समिती सदस्य योगेश नवले व जिल्हा संघटनचे गजाननराव जगताप, विलासराव दशमुखे, जयवंतराव पवार, रामभाऊ निचळ, विशालराव नवले, प्रमोदराव बाविस्कर, सुनिल राव चव्हाण, विजय देवबा चोपडे, तुकाराम सुरतकर, दिपकराव क्षीरसागर, सचिन चोपडे तसेच महिला सदस्य यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.