बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जाबीर पठाण नावाचा विद्युतचोर एजंट शिरपूर ता. जि.बुलढाणा येथे राहतो.पैशांसाठी लोकांच्या घरी जाऊन विद्युत मीटरचे काम करून देण्याची बतावणी करीत मीटर मध्ये छेडाछाड करतो आणि नंतर हेच मीटर महावितरण कडून पकडून देतो.असा पठाणचा धंदा असून तो या धंद्यातून पठाणी वसुली करीत असल्याच्या आरोपाची फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे.
महावितरणने आपल्या वीज ग्राहकाला विद्युत मीटर दिले आहे.या विद्युत मीटर मध्ये छेडछाड करणे कायद्याने गुन्हा आहे.परंतु शिरपूरच्या जाबीर पठाणने विद्युत मीटर चे काम करून देतो म्हणून पैसे उकळण्याचा धंदा सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.लोकांच्या विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून पैसे वसूलतो.नंतर त्यांची कंप्लेंट करण्याचा उपद्व्याप करतो.पठाणच्या उपद्रवाला अनेक जण कंटाळले असून,अनेकांनी पठाणला फोन करणे सुरू केले आहे.लोकांनी फेसबुकचा आधार घेत त्याचा फोटो व्हायरल करून पठाण पासून सावध राहा असा इशारा देऊन पठाणला ‘आमचे मिटर जसे होते तसे करून दे अन्यथा कोर्टात खेचू , जो दंड होईल तो भरपाई करून घेऊ’ असा मेसेज व्हायरल करण्यात आला आहे.










