बुलढाणा (हॅलो बुलढाणा) देशाची एकात्मता खंडित करून दंगल घडविण्याचा प्रयास करणाऱ्या नितेश राणेंना त्वरीत अटक करावी. हिंदू मुस्लिम दंगल घडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्या प्रकरणी त्यांच्या सभा व मोर्चांना परवानगी नाकारावी.
पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करणे, सामाजिक तेढ निर्माण करने.दंगल घडविण्याचे षडयंत्र रचने. पवित्र श्रद्धास्थान असलेल्या मज्जिदीमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी देणे. प्रकरणी बुलढाणा शहर पोस्टेला नियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेशित करणे. या प्रमुख मागण्यांसाठी हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील प्रथम निषेध आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
मागण्यांची पूर्तता न झाल्यास हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने यापुढे बुलढाणा जिल्हा बंदची हाक देण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. नितेश राणे यांना अटक करा, संविधान जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद चे नारे देत बुलढाणा शहरातील इंदिरानगर येथून निषेध आक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली. क्षय आरोग्यधाम, बस स्टॅन्ड,नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (संगम चौक) जयस्तंभ चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे सभेत रूपांतर झाले यावेळी मन्सूर सहाब इमाम, ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील, हापिस मुजाहिद साहब, मौलाना मुजीब, यांनी मोर्चाला संबोधित केले.
सभेनंतर निवेदन देतेवेळी हापिस रहमत खा, मुफ्ती जमीर साहब, मौलाना समीर साहब, समीर खान, मुफ्ती जमीर सिराजी,जयश्रीताई शेळके, हर्षवर्धन सपकाळ,मोहम्मद सज्जाद, शेख समीर, जनसेवक मोहम्मद सोफियान, डॉ. मोबीन, बबलू कुरेशी,जाकीर कुरेशी, जुनेद डोंगरे, दानिश अजहर, असलम शाह, नदीम शेख,साबिर अली,बिलाल डोंगरे, हरीश रावळ, रिजवान सौदागर,आदींची उपस्थिती होती.
▪️काय म्हटले आहे निवेदनात?
निवेदनात नमूद केले आहे की महाराष्ट्रात सकल हिंदू मोर्च्यांच्या माध्यमातून नितेश राणे सामाजिक तेढ निर्माण करीत आहे. येणा-या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हिंदू मुस्लिम वाद निर्माण झाला पाहिजे. हिंदू मुस्लिम दंगल घडली पाहिजे.हा कुटील हेतू ठेवून नितेश राणे यांनी सुनियोजित कट कारस्थान रचले आहे. मुस्लिमांना मज्जीदीत जाऊन चुन चुन के मारेंगे, पोलीस माझे काहीही वाकडे करू शकत नाही. सदर वक्तव्यांमुळे सामाजिक दरी निर्माण होणार नाही. भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही. देशात लोकशाही जिवंत आहे हा उदांत संदेश सामान्यांना देणे करिता. सदर मोर्चाचे आयोजन बुलढाणा शहरात करण्यात आले होते.