बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ सुरू असताना, आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरी झालेल्या 6,15,000 रुपयांच्या तब्बल 15 मोटरसायकली हस्तगत करून 2 मोटरसायकल चोरट्यांना गजाआड केले आहे.सय्यद निसार सय्यद युनूस वय 23 राहणार राजुर तालुका मोताळा,शेख राजा शेख दाऊद वय 23 राहणार कर्डी धाड जिल्हा बुलढाणा असे या आरोपींची नाव आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही कारवाई केली.अन्वर का अफसर खा पठाण राहणार शिरूर तालुका चिखली यांनी 29 फेब्रुवारी 2022 ला अमडापूर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार दिली होती.दरम्यान पोलिसांनीयाप्रकरणी तपास करीत असताना बुलढाणा शहरातून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.आरोपींकडून अमडापूर औरंगाबाद व अहमदनगर येथील तीन गुन्ह्यांची उकल करण्यात आली.










