लोणार (हॅलो बुलढाणा/लखन जाधव) शिवछत्र मित्रमंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांच्या संकल्पनेतील शिवछत्र मित्रमंडळाच्या माध्यमातून जनता दरबारला काल पासून सुरुवात झाली असून नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.शिवाय समस्यांचे निराकरणसुद्धा झाले आहे.
शिक्षक दिनाच्या शुभ मुहूर्तावर दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत श्री टॉकीज येथे पहिला जनता दरबार भरविला गेला.आता दर गुरुवारी हा उपक्रम राबविणार आहेत.या माध्यमातून नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या अडचणी शासन, प्रशासनाच्या माध्यमातून ते सोडविणार आहेत.आजच्या जनता दरबाराला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
नागरिकांच्या समस्या सुटल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करून आभार मानले.आज झालेल्या जनता दरबारात नंदूभाऊ मापारी सह अशोकभाऊ वारे, भगवानराव कोकाटे, सुधाकरभाऊ मापारी, विनायक मापारी, अरुण गिते, पांडुरंग मुन्ढे सह ग्रामीण भागातील अनेक मंडळी हजर होती.