बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नितेश राणे विरोधात आज शहरांमध्ये दुपारी ३ वाजता निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
राजकीय मनसुबे साध्य करण्यासाठी सामाजिक द्वेष पसरविणे,सामाजिक तेढ निर्माण करणे,दंगल घडविण्याचा प्रयास करणे, यासाठी आमदार नितेश राणे यांना अटक करावी. बुलढाणा शहर पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करावा.त्यांच्या सभांना बंदी घालावी. यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी जिल्ह्यातील हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने आज आक्रोश निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा इंदिरा नगर, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (संगम चौक) जयस्तंभ चौक या प्रमुख मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
पाऊस असला तरी मोर्चा निघेल याची नोंद घेत मोर्चात सहभागी व्हावे,असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.